गुरुवार, १७ जून, २०१०

वास्तु दोष दूर करण्याचे उपाय


वास्तु दोष दूर करण्याचे उपाय
आपल्या जीवनात वास्तूचे महत्त्व बरेच असल्याने या विषयाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. जीवनात वास्तुदोष असल्यामुळे  अनेक संकटे येतात. त्याने घराची सुख-शांती भंग होते. म्हणून  वास्तु मध्ये काही सहज सोप्या गोष्टींचा वापर करुन आपण वास्तु मध्ये शुभता आणू शकतो तसेच परिवर्तन करून वास्तु दोषापासून आपण मुक्त होऊ शकतो. पुढे काही मुलभूत उपाय योजना दिलेल्या आहेत त्यांचा वापर करा व आपल्या जीवनात सौख समाधान प्राप्त करा.

देवघर
 सर्वप्रथम आपल्या घरा मध्ये देवघर योग्य जागी आणा व योग्य प्रकारे देवता मांडा आणि बघा आपल्याला प्रगतिच्या संधी कशा लाभतात

१ देवघर घरच्या ईशान्य भागामध्ये अशा प्रकारे मांडा की पुजा करताना आपले तोंड पुर्व दिशेला होइल.
२ देव्हार्‍या मध्ये गणपति आपली कुलदेवता  नेहमी पुजा करतो ती इष्ट देवता लक्ष्मी नारयण अन्नपुर्णा शिव पिंड इतक्याच मोजक्या देवता मांडा. सर्व घरभर देवतांचे प्रदर्शन मांडु नका.
३ देवासमोर रोज सकाळी तुपाचा दीवा लावा व संध्याकाळी तेलाचा दिवा लावा.
४ एका कलशात पाणी भरुन त्यात चांदीची नाणी रत्न पैसे नेहमी ठेवा रोज पाणी बदला वर नारळ ठेवउन वरुणाची पुजा केली तरी चांगले.
५ देव्हार्‍या मध्ये काही धन देणारी वास्तु  दोष दुर करणारी यंत्र लावावीत.
६ रोज सुगंधी उद्बत्ती धुप देवास दखवल्यास धन पैसा यांची बरकत नक्कीच होते.

७ देव्हार्‍या मध्ये दिवंगतांचे फोटो कधीच लाऊ नका.
८ दिवंगतांचे फोटो लावल्याने त्या व्यक्तीस सदगति मिळण्यास अडचण होते. आपले पित्र जर आपले आदर्शच असतील किंवा लोक लाजेस्तव लावायचेच असतील तर नेहमी दिवंगतांचे फोटोचे दक्षिणेकडे तोंड होइल अशा प्रकारे लावावेत.
९ कोर्ट कचेरीची फाइल देव्हार्‍या मध्ये  ठेवल्याने खटला जिंकण्यास मदत होते.
१० देव्हार्‍यास कळस नसावा त्यामुळे प्रगति होण्याच्या वाटा खुंटतात.
११ देवघर व बेडरुम एकत्र येत असल्यास देवा समोर एक उघड बंद करता येण्या जोगा पडदा किंवा दाराची योजना करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा